722. 26 जानेवारी 2019 प्रजासत्ताक दिनी सिरील रामाफोस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
1)युगांडा 2)पश्चिम आफ्रिका 3)इंडोनेशिया 4)दक्षिण आफ्रिका
723. 1929 साली 'प्राग' इथे भरलेल्या 'विमेन्स लीग ऑफ पीस अँड फ्रीडम' परिषदेस खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
1)उर्मिलादेवी 2)कमलादेवी चटोपाध्याय 3)अवंतिकाबाई गोखले 4)हंसाबेन मेहता
724.काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेत 'शेतकऱ्यांच्या मागण्यांचा' समावेश कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्यात आला होता?
1)1925 बेळगाव अधिवेशन 2)1931 कराची अधिवेशन
3)1919 अमृतसर अधिवेशन 4)1920 वर्धा अधिवेशन
725. नाशिकला जॅक्सन वधाच्या खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली होती?
अ. कान्हेरे
ब.कर्वे
क.देशपांडे
ड.गोखले
1)अ,ब,क,ड 2)अ,ब,क 3)फक्त अ 4)अ,क,ड
726. 31 डिसेंबर 1947 रोजी भारतीय संविधान सभेत भारतीय प्रांतांचे 229 सदस्य व भारतीय संस्थानांचे 70 सदस्य घटनासमितीत असावे असे निश्चित करण्यात आले होते. खालीलपैकी कोणत्या संस्थानाचे सदस्य सर्वाधिक असणार होते?
1)काश्मीर 2)हैद्राबाद 3)त्रावणकोर 4)म्हैसूर
727. भारतीय घटना समितीचे एकूण 11 अधिवेशन पार पडले होते. शेवटचे 11 वे अधिवेशन कोणत्या दिवशी सुरू झाले होते?
1)17 ऑक्टोबर 1949 2)14 नोव्हेंबर 1949 3)24 जानेवारी 1950 4)24 नोव्हेंबर 1949
728. भारतीय राज्यघटना विस्तृत स्वरूपात असण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत?
अ. घटना समितीत असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व
ब. केंद्र-राज्य यांच्यासाठी असलेले एक संविधान
क. 1935 च्या कायदाचा राज्यघटनेवर असलेला प्रभाव
ड. देशाचा प्रचंड आकार व भौगोलिक विविधता
पर्याय
1)अ,ब,क,ड 2)अ,ब,क 3)ब,क,ड 4)अ,क,ड
729.
अ. संसदीय पद्धत ही कार्यकारी विभाग आणि कायदेमंडळ यांतील सहकार्य आणि समन्वय या तत्वांवर आधारलेली आहे.
ब. अध्यक्षीय पद्धत ही कार्यकारी विभाग आणि कायदेमंडळ यांतील अधिकार विभाजन तत्वावर आधारलेली आहे.
वरील विधानांचा विचार करा.
पर्याय
1)अ,ब दोन्ही योग्य 2)अ योग्य , ब अयोग्य
3)अ अयोग्य , ब योग्य 4)अ,ब दोन्ही अयोग्य
उत्तरे
722. 4
723. 2
724. 3
725. 2
726. 4
727. 2
728. 1
729. 1
No comments:
Post a Comment