Monday, December 31, 2018
Friday, November 23, 2018
राज्यसेवा पूर्व २०१९ व संयुक्त गट - ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा २०१९ सरावप्रश्न
722. 26 जानेवारी 2019 प्रजासत्ताक दिनी सिरील रामाफोस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
1)युगांडा 2)पश्चिम आफ्रिका 3)इंडोनेशिया 4)दक्षिण आफ्रिका
723. 1929 साली 'प्राग' इथे भरलेल्या 'विमेन्स लीग ऑफ पीस अँड फ्रीडम' परिषदेस खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
1)उर्मिलादेवी 2)कमलादेवी चटोपाध्याय 3)अवंतिकाबाई गोखले 4)हंसाबेन मेहता
724.काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेत 'शेतकऱ्यांच्या मागण्यांचा' समावेश कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्यात आला होता?
1)1925 बेळगाव अधिवेशन 2)1931 कराची अधिवेशन
3)1919 अमृतसर अधिवेशन 4)1920 वर्धा अधिवेशन
725. नाशिकला जॅक्सन वधाच्या खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली होती?
अ. कान्हेरे
ब.कर्वे
क.देशपांडे
ड.गोखले
1)अ,ब,क,ड 2)अ,ब,क 3)फक्त अ 4)अ,क,ड
726. 31 डिसेंबर 1947 रोजी भारतीय संविधान सभेत भारतीय प्रांतांचे 229 सदस्य व भारतीय संस्थानांचे 70 सदस्य घटनासमितीत असावे असे निश्चित करण्यात आले होते. खालीलपैकी कोणत्या संस्थानाचे सदस्य सर्वाधिक असणार होते?
1)काश्मीर 2)हैद्राबाद 3)त्रावणकोर 4)म्हैसूर
727. भारतीय घटना समितीचे एकूण 11 अधिवेशन पार पडले होते. शेवटचे 11 वे अधिवेशन कोणत्या दिवशी सुरू झाले होते?
1)17 ऑक्टोबर 1949 2)14 नोव्हेंबर 1949 3)24 जानेवारी 1950 4)24 नोव्हेंबर 1949
728. भारतीय राज्यघटना विस्तृत स्वरूपात असण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत?
अ. घटना समितीत असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व
ब. केंद्र-राज्य यांच्यासाठी असलेले एक संविधान
क. 1935 च्या कायदाचा राज्यघटनेवर असलेला प्रभाव
ड. देशाचा प्रचंड आकार व भौगोलिक विविधता
पर्याय
1)अ,ब,क,ड 2)अ,ब,क 3)ब,क,ड 4)अ,क,ड
729.
अ. संसदीय पद्धत ही कार्यकारी विभाग आणि कायदेमंडळ यांतील सहकार्य आणि समन्वय या तत्वांवर आधारलेली आहे.
ब. अध्यक्षीय पद्धत ही कार्यकारी विभाग आणि कायदेमंडळ यांतील अधिकार विभाजन तत्वावर आधारलेली आहे.
वरील विधानांचा विचार करा.
पर्याय
1)अ,ब दोन्ही योग्य 2)अ योग्य , ब अयोग्य
3)अ अयोग्य , ब योग्य 4)अ,ब दोन्ही अयोग्य
उत्तरे
722. 4
723. 2
724. 3
725. 2
726. 4
727. 2
728. 1
729. 1
Monday, October 15, 2018
DIAC अँप- MPSC ONLINE LECTURES
- MPSC ची तयारी घरी बसून करणाऱ्या विध्यार्थ्यांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे ... क्लास साठी कुठे बाहेरगावी जायची गरज नाही.
- तुमचा क्लास आता तुमच्या घरी असेल.
- DIAC च्या माध्यमातून आम्ही एक डिजिटल चळवळ सुरू केली असून यामध्ये तुम्हाला MPSC चा सर्व क्लास, सर्व Lectures घरी बसून पाहता येतील म्हणजे तुम्ही जिथे आहेत तिथून तुम्हाला MPSC चा अभ्यास करता येईल आणि अधिकारी बनायचे आपले स्वप्न पूर्ण करता येईल असे सर्व मार्गदर्शन आणि ONLINE LECTURES तुमच्या MOBILE मध्ये उपलब्ध असतील.
- खाली एक डेमो lecture दिले आहे ज्यामध्ये MPSC साठी प्राचीन इतिहास चा अभ्यास कसा करावा याचे संपूर्ण मार्गदर्शन दिले गेले आहे.
- हे lecture नक्की पहा. https://youtu.be/ZJ3cA1fiJqc
- तसेच MPSC चे सर्व मार्गदर्शन आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी DIAC अँप खाली दिलेल्या लिंक वरून इन्स्टॉल करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.isoftinc.diac
- Lectures पाहण्यासाठी खालील लिंक वरून आमचे youtube channel subscribe करा. https://m.youtube.com/channel/UCyKSYbm_MCv8IVQG0o74dew
Thursday, October 4, 2018
अर्थशास्त्र नोट्स भाग १ , संकलन - प्रशांत खेडकर(राज्य कर निरीक्षक)
घटक
१. भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र
२. भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्ये
३. राष्ट्रीय उत्पन्न
४. राष्ट्रीय उत्पन्न मोजणी
नोट्स लिंक - अर्थशास्त्र नोट्स भाग 1
१. भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र
२. भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्ये
३. राष्ट्रीय उत्पन्न
४. राष्ट्रीय उत्पन्न मोजणी
नोट्स लिंक - अर्थशास्त्र नोट्स भाग 1
Wednesday, September 26, 2018
Tuesday, September 25, 2018
PSI-STI-ASO 2019 Study Plan By Prashant Khedkar (STI 2017)
★PSI-STI-ASO 2019 करिता अभ्यास कसा करावा★
1. अभ्यासाचे विषयवार नियोजन
प्रथम गट - GS द्वितीय गट - बुद्धीमत्ता व अंकगणित तृतीय गट - चालू घडामोडी
चतुर्थ गट - Revision
तुम्ही जो अभ्यास करणार त्याचे 4 घटक असावेत.
★प्रथम गट विषय - इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , विज्ञान (काही अंशी पर्यावरण)
या गटातील एक विषय अभ्यासास घेतला तर तो पूर्ण विषय पूर्ण होईपर्यंत रोज त्याच विषयाचे 6 तास वाचन - नोट्स काढणे करावे.
एक विषयास(एक पुस्तक) 20-25 दिवस नोट्स करिता पुरेसे आहेत.
अश्या प्रकारे सर्व 5 GS विषय अभ्यास पूर्ण होण्यास - 100 दिवस लागतील (ज्यात एक पुस्तक प्रत्येक विषयाचे वाचून पूर्ण होईल, नोट्स सह)
या गटातील एक विषय अभ्यासास घेतला तर तो पूर्ण विषय पूर्ण होईपर्यंत रोज त्याच विषयाचे 6 तास वाचन - नोट्स काढणे करावे.
एक विषयास(एक पुस्तक) 20-25 दिवस नोट्स करिता पुरेसे आहेत.
अश्या प्रकारे सर्व 5 GS विषय अभ्यास पूर्ण होण्यास - 100 दिवस लागतील (ज्यात एक पुस्तक प्रत्येक विषयाचे वाचून पूर्ण होईल, नोट्स सह)
★द्वितीय गट विषय - बुद्धीमत्ता आणि अंकगणित
या विषयाचा जास्तीत जास्त सराव केल्यास पूर्व परीक्षेत येणारे 15 प्रश्न व मुख्य परीक्षेत येणारे 10 प्रश्न हमखास मार्क देऊन जाणारे आहेत.
त्यामुळे या घटकांचा रोज 2 तास तरी सराव आवश्यक.
(टीप - हा घटक Ignore केल्यास पूर्व परीक्षा पास होणे कठीण)
या विषयाचा जास्तीत जास्त सराव केल्यास पूर्व परीक्षेत येणारे 15 प्रश्न व मुख्य परीक्षेत येणारे 10 प्रश्न हमखास मार्क देऊन जाणारे आहेत.
त्यामुळे या घटकांचा रोज 2 तास तरी सराव आवश्यक.
(टीप - हा घटक Ignore केल्यास पूर्व परीक्षा पास होणे कठीण)
★तृतीय गट - चालू घडामोडी
--सर्वात Productive मात्र काय वाचावे यात Confusion करणारा घटक.
-- मुद्दा 1 - वृत्तपत्र वाचन - 15-30 मिनिटपेक्षा जास्त नको.
-- मुद्दा 2 - चालू घडामोडीचे केवळ एक पुस्तक वाचावे, कोणतेही नवीन पुस्तक आले की घेऊन जमा करू नये.
-- मुद्दा 3 - या घटकांचा अभ्यास व नोट्स रोज 2 तास हवे. हा घटकही पूर्व परीक्षेत 15 व मुख्य परीक्षेत 10 मार्क हमखास देऊन जातो.
--सर्वात Productive मात्र काय वाचावे यात Confusion करणारा घटक.
-- मुद्दा 1 - वृत्तपत्र वाचन - 15-30 मिनिटपेक्षा जास्त नको.
-- मुद्दा 2 - चालू घडामोडीचे केवळ एक पुस्तक वाचावे, कोणतेही नवीन पुस्तक आले की घेऊन जमा करू नये.
-- मुद्दा 3 - या घटकांचा अभ्यास व नोट्स रोज 2 तास हवे. हा घटकही पूर्व परीक्षेत 15 व मुख्य परीक्षेत 10 मार्क हमखास देऊन जातो.
★चतुर्थ घटक -
● GS अभ्यास आपण एक विषयाचा करतोय त्यामुळे इतर विषयात 20 दिवस मागे पडू नये म्हणून हा घटक अत्यावश्यक.
● ज्या विषयाचा अभ्यास सुरू आहे , तो विषय वगळून इतर GS विषयांची रोज 15-20 मिनिट अश्याप्रकारे 2 तास उजळणी करावी.
●जेणेकरून प्रत्येक विषय Update राहील.
● GS अभ्यास आपण एक विषयाचा करतोय त्यामुळे इतर विषयात 20 दिवस मागे पडू नये म्हणून हा घटक अत्यावश्यक.
● ज्या विषयाचा अभ्यास सुरू आहे , तो विषय वगळून इतर GS विषयांची रोज 15-20 मिनिट अश्याप्रकारे 2 तास उजळणी करावी.
●जेणेकरून प्रत्येक विषय Update राहील.
3. PSI-STI-ASO तयारी करताना Plan B कसा असावा.
●सर्वात सोपा Plan B हा तुम्ही तयार करू शकता तो म्हणजे रोज 2 तास इंग्रजी व मराठी विषयांचा अभ्यास .
●या अभ्यासामुळे PSI-STI-ASO वगळता इतर सरळसेवा परीक्षा तुम्हाला व्यवस्थित देता येतील.
●पोस्ट जॉईन करणे , न करणे तुमच्या हातात आहे मात्र , कोणतीही सरळ सेवा परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारे समाधान खूप असते.
★मी स्वतः STI आधी म्हाडा लिपिक(राज्यात प्रथम) , सहायक वाहतूक निरीक्षक(ST महामंडळ) , सांख्यियीकी सहायक व अन्वेषक या पदांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो होतो.
4. घरच्यांचा , आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्या यशाचे आनंदाश्रू असावे यासाठी अभ्यास करा.
5. स्वतःला फसवू नका, म्हणजे काय ते खाली काही उदाहरण आहेत.
★घरचे तुम्हाला पैसे पाठवतात , ते काबाडकष्ट करून त्यांची किंमत करा.
★घरच्यांचे पैसे अभ्यासावर खर्च करा. पार्टी , लोणावळा खंडाळा फिरणे , ट्रेकिंग यावर खर्च करू नका.
(परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला जिकडे फिरायचे तिकडे फिरा घरचे पण काही बोलणार नाही.)
★अभ्यास करायला पुणे गेलेच पाहिजे का?
--ज्यांना घरात पैसे ठेवायला जागा नसेल त्यांनी हमखास पुणे जावे, मात्र ज्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे किंवा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांनी कुठंही अभ्यास केला तरी अभ्यास होतो.
★अभ्यासाला पुणेच गेले पाहिजे व पुणे गेले की पास होते असे ज्यांना वाटते त्यांना एकच सांगेल पुणेला 80000 च्या आसपास विद्यार्थी सध्या अभ्यास करतात त्यातले 200 पास होतात.
त्यामुळे उगाच पुणे जाऊन मज्जा करायची असेल तर घरच्यांना फसवू नका व स्वतःच्या 😊
मनाला फसवू नका.
6. इतर काही शंका असल्यास t.me/STI_Prashant या माझ्या telegram लिंकवर संपर्क करावा.
प्रशांत मधुकर खेडकर
(राज्यकर निरीक्षक 2017)
Saturday, September 22, 2018
अर्थशास्त्र नोट्स By Prashant Khedkar(STI 2017)
मित्रांनो, मी प्रशांत मधुकर खेडकर तुमच्यासारखाच एक विद्यार्थी , २०१७ च्या बॅचमध्ये राज्यकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.
पदावर निवड झाली याचा अर्थ मी महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा फार वेगळा किंवा अभ्यासू आहे असे नाही तर फक्त प्रत्येक विषयाच्या नोट्स काढून अभ्यास केला आहे.
आज महाराष्ट्रात तयार नोट्स वाचणे , कोणतीही शहनिशा न करता थेट कोणतेही पुस्तक वाचण्याची पद्धत विद्यार्थी अवलंबत आहेत. याचा परिणाम तुमच्या निकालावर दिसून येईल मित्रांनो, स्टॅंडर्ड रेफरन्स पुस्तके वापरा.
स्वतःच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स काढा, इतरांच्या नोट्स फक्त Value Addition करिता वापरा.
अर्थशास्त्र या विषयाच्या नोट्स कश्या काढाव्या याकरिता मी माझ्या नोट्स उपलब्ध करून देत आहे. त्यातील आकडेवारी Update करून वाचावी . तसेच काही आकडेवारी व माहिती बदलली असण्याची शक्यता आहे .
सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा ....
नोट्स बाबत अथवा अभ्यासाबाबत काही शंका असल्यास https://t.me/STI_Prashant या टेलिग्राम लिंकवर विचारा.
पदावर निवड झाली याचा अर्थ मी महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा फार वेगळा किंवा अभ्यासू आहे असे नाही तर फक्त प्रत्येक विषयाच्या नोट्स काढून अभ्यास केला आहे.
आज महाराष्ट्रात तयार नोट्स वाचणे , कोणतीही शहनिशा न करता थेट कोणतेही पुस्तक वाचण्याची पद्धत विद्यार्थी अवलंबत आहेत. याचा परिणाम तुमच्या निकालावर दिसून येईल मित्रांनो, स्टॅंडर्ड रेफरन्स पुस्तके वापरा.
स्वतःच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स काढा, इतरांच्या नोट्स फक्त Value Addition करिता वापरा.
अर्थशास्त्र या विषयाच्या नोट्स कश्या काढाव्या याकरिता मी माझ्या नोट्स उपलब्ध करून देत आहे. त्यातील आकडेवारी Update करून वाचावी . तसेच काही आकडेवारी व माहिती बदलली असण्याची शक्यता आहे .
सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा ....
नोट्स बाबत अथवा अभ्यासाबाबत काही शंका असल्यास https://t.me/STI_Prashant या टेलिग्राम लिंकवर विचारा.
Notes Link - अर्थशास्त्र नोट्स
सागर ढवळे सर(तहसिलदार 2017 , राज्यकर निरीक्षक 2016 , PSI 2016 बॅच , उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक 2017) यांची पोलीस उपनिरीक्षक मुलाखत अनुभव
मित्रांनो.. PSI चे interview जवळ आले आहेत... तरी जे मुलाखतीला असतिल त्यांच्यासाठी मी माझी PSI चि मुलाखत शेअर करत आहे.(.तहसीलदार चि नंतर करेल) .थोडसं महत्वाचे - PSI ला physical test ला खूप मार्क्स असले तरच मुलाखतीला मार्क्स पडतात असा समज चुकीचा आहे.. मला 75 मार्क्स होते. तरीही मुलाखतीला जास्त मिळाले.. त्यामुळे फिजिकल ला जरी एखाद्या मित्राला कमी मार्क्स मिळाले तरी त्यानी घाबरायचे काहीच कारण नाही..खर बोललात तर मार्क्स 100% मिळतातच..
*नाव- सागर अरुण ढवळे *
*तालुका-शिरुर जिल्हा-पुणे *
*_निवड- Psi २०१६_*
*एकूण गुण- 243*
मुख्य परीक्षा गुण-137/200
मैदानी चाचणी गुण- 75/100
मुलाखत गुण - 31/40
शिक्षण- B. Sc agri.(76%) कृषी महाविद्यालय,पुणे. जून 2016 passout year,,
१२वी- चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय
. शिरुर (75%)
10 वी - न्यू इंग्लिश स्कूल, शिरुर. (74%)
Panel-१) श्री. ओक सर २) Addl. SP...srimati....सातपुते मॅडम
मुलाखत दिनांक _13 ऑक्टोबर _ २०१७ वेळ.. 4 .
ठिकाण - पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे.
🔹 त्यादिवशी दुपारच्या सत्रात खूप पाऊस सुरू झाला.. आम्ही 6-8 जण राहिलो होतो. पाऊस इतका होता की आमचे सर्वांचे ड्रेस ओले झाले होते...आम्हाला आम्ही होतो त्या ठिकाणावरून आम्हाला पोलिसांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला Interview रूम च्या समोर आणून सोडले.. (छत्री डोक्यावर घेऊन).. पाऊस होता आणि उमेदवार थोडे राहिल्यामुळे जरा घाईतच झाले Interview.
🔹माझ्या आधीचा उमेदवार बाहेर आल्यानंतर शिपायाने मला आत जायला सांगितले
मी: आत येऊ सर?
ओक सर: - हो. या बसा.
⭕ _मी आत जाऊन दोघांनाही wish केले.(प्रथम मॅडम ना wish केले.) मला बसायला सांगितले.
मी: thank you sir. आनि बसलो मग.
सर: कुठून आलात..?
मी: सर. मी मुक्काम पोस्ट chinchani. तालुका - शिरुर. जिल्हा- पुणे इथून आलो आहे.
सर: degree कशा मधे झाली?
मी - sir. माझे bsc agriculture झाले.. (यानंतर डायरेक्ट टेक्निकल गोष्टी चालू झाल्या)
सर: पोलिसांचे महत्वाचे कायदे सांगा?
मी: IPC, CRPC, EVIDENCE act. Mumbai police act... Ase सांगितले..
सर: long फॉर्म सांगा.
(मी पूर्ण long-form सांगितले.)
सर: पोलिसांच्या वेगवेगळ्या wings सांगा.?
मी:.. CID. गुन्हे शाखा., .Anti.terrosist squad, खंडणी विरोधी पथक., आर्थिक गुन्हेगारी विरोधी पथक.,बॉम्ब पथक. श्वान पथक. (अश्या 8-10 wings सांगितल्या..)..
सर: SID माहीत आहे का?
मी: ............(मला माहीत होत पण ऐन वेळी मला आठवलं नाही).. Sorry sir.. मला याबद्दल माहीत नाही..
सर: सदोष मनुष्यवधा आणि खून यामधील फरक सांग?
मी:...... सर सदोष मनुष्यवधा मध्ये मृत्यू होईल असा हेतू नसतो.. उदाहरणार्थ अपघात किंवा नजरचुकीने झालेली घटना.. खुनामागे व्यक्तिला जीव मारण्याचा हेतू असतो.
सर: उदाहरण देऊन सांगा..
मी: पुस्तकामधील पाठ केलेले अ, ब. हे उदाहरण. Detail सांगितले.. (पण सांगताना थोडासा गडबडलो, तेव्हा sirani स्वतःहून मला एक्सप्लेन केले... मी thank you म्हटले.
मॅडम ना विचारायला सांगितले..
सर: passout कधी झाला?
मी: mam, जुन 2016
Madam - यावर्षीची Civil चि mains दिली का?
मी: हो,, मॅडम
मॅडम: first preference कोणता देणार?
मी: DYSP (मी लगेचच उत्तर दिले म्हणून मॅडम हसल्या.)
मॅडम - (अचानक डिग्री वर question).. Totipotency म्हणजे काय?
मी: mam. Totipotency म्हणजे regeneration capacity of plant from any parts of it.. (मला एवढ माहीत होत फक्त).. मी एवढ सांगून stop घेतला
मॅडम: callus culture mhnje काय)
मी:mam. Callus cम्हणजे undifferentiated mass of plant body... And it's culture is called as callus culture... (हे degree मधे पाठ केलेली definition होती. But मी या answer वर confident नव्हतो.. पण मी तोंडावर तस काही दाखवले नाही...
सर - तुमची hobby क्रिकेट आहे, तुम्ही football mdhe gold medalist आहेत, athletics मधे silver medal आहे... बरोब्बर का?
मी: येस सर... बरोब्बर
सर - भारतात क्रिकेट एवढ का फेमस आहे?..
मी: सर. क्रिकेट हे ब्रिटिश काळापासून भारतात खेळले जाते.. आणि खूप सोपा खेळ असून कुठेही खेळता येतो.. तसेच नियम ही सर्वसामान्यांना कळतात .. No infrastructure is needed for that..emotional attachment पण खूप आहे... भारत पाकिस्तान सामने ही यामधे भर घालतात... आनि अजून. एक फळी and एक बॉल असल की बस्स मग.(मी एवढ सांगून थांबलो.. सर अणि मॅडम दोघेही माझ्याकडे बघत होते..)
सर - आता जो फुटबॉल चा एक event झाला इंडिया मधे काही माहीत आहे का?..
मी: सर under 17 चा वर्ल्ड कप झाला..
सर - आपल्या पंतप्रधानांनी एक कार्यक्रम केला hotat त्यासाठी... तो सांगा..
मी: (मला आठवले नाही. मी ट्राय करत होतो). सर mission one million as काहीतर नाव आहे but मला पूर्ण आठवत नाहिये.. सॉरी..
सर - police का hoychay?..म्हणजे. काही चुलता. भाऊ. पोलिस आहे का?.. की एखादा police officer लहानपणी शाळेत आला होता का?.. अस काही आहे का?..
मी:(या प्रश्नाचे उत्तर मी तयार केले नव्हते कारण मी PSI ची मुलाखत अशीच देणार होतो.. माझा राज्यसेवा चा स्कोर चांगला होता म्हणून मी या मुलाखती कडे जास्त लक्ष नव्हते दिले.. मला जे वाटल ते मी सांगितल.) .. सर.. तस काहीच नाहिये. मला पोलिस सेवेबद्दल आवड आहे.. तसेच माझे college ही या मुख्यालयाच्या समोर असल्यामुळे मी बर्यापैकी या मुख्यालय मधे टाइम घालवण्यासाठी यायचो. तेव्हा पोलिस च्या वर्दी बद्दल खूप आकर्षण वाटले..... (या प्रश्नामुळे मला one of the highest marks मिळाले. .. Interview rank - 3rd in maharashtra.)
सर. - ठीके तुम्ही येऊ शकता...
मी - (उठलो.. आनि दोघानाही thank you. म्हटलं.. आनि जाता जाता काय माहीत अचानक थांबलो अणि पुन्हा................ अचानक बोललो..
मी - सर,, मॅडम.. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या माझ्याकडुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
(दोघेही थोडे हसले... आनि सर म्हटले तुम्हाला पण शुभेछा..)
*Note-*
_*माझे मुलाखतीचे मार्क्स 40 पैकी 31 आहेत ते जास्त येण्याची कारणे*_
🔹मी थोड घाबरलो होतो पण लगेच स्वतः la सावरले.. आनि सर्वात महत्वाचे म्हणजे खर बोललो....
*माझी राज्यसेवा चि मुलाखत खूप चांगली होती... As compared to PSI..त्यातही मला 66 गुण मिळाले..one of the highest... त्यात खूप interesting गोष्टी घडल्या.... . .. ती ही मी लवकरच शेअर करेल...
_________🙏__________
🔷 *#सागर अरुण ढवळे *
Wish you all the best.....
प्रहार क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी
◆प्रहार क्षेपणास्त्र - DRDO द्वारे यशस्वी चाचणी
◆इंटिग्रेटेड टेस्ट रेंज , बेलासोर , ओडिशा इथे चाचणी
★प्रहार क्षेपणास्त्र माहिती
1. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे , लघु पल्ल्याचे , Quick Reaction क्षेपणास्त्र
2. लांबी - 7.3 मीटर
3. व्यास - 420mm
4. वजन - 1280 किग्रॅ
5. पल्ला - 150 किमी
6. 200 किग्रॅ स्फोटक वाहण्याची क्षमता
Friday, September 21, 2018
अटल बिमित कल्याण योजना

★योजना - श्रम मंत्रालयाद्वारे
★घोषणा - ESIC च्या 175 व्या बैठकीत , केंद्रीय श्रम राज्य मंत्री संतोष गंगवार यांच्याद्वारे घोषणा
★Nodal Agency - कर्मचारी राज्य विमा निगम
★योजना लाभार्थी - ESIC कायदा 1948 अंतर्गत 2 वर्ष विमा असलेले कर्मचारी
★योजना स्वरूप - रोजगाराच्या बदलत्या स्वरूपामुळे नौकरी गमावलेल्या विमा असलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन नौकरी शोधत असताना 'विशिष्ट भत्ता' दिला जाणार.
★जुनी नौकरी सोडल्यानंतर 3 महिने जर नवीन नौकरी प्राप्त न झाल्यास ESIC मध्ये विमा रक्कम म्हणून जमा केलेल्या रकमेच्या 47% रक्कम विमा धारक बेरोजगार व्यक्तीस काढता येणार

Thursday, September 20, 2018
Cyclone - 30 रेडिओऍक्टिव्ह आयसोटोप निर्मिती यंत्र
◆सायक्लोन 30 - कॅन्सर निदान करणारे विविध रेडिओ आयसोटोप्स बनवण्यासाठी सायक्लोट्रॉन यंत्राचा वापर (त्याचेच नामकरण - सायक्लोन 30 केले आहे)
◆कलकत्ता येथील Variable Energy Cyclotron Centre या अणू ऊर्जा आयोगाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रात सायक्लोन 30 सुरू होत आहे
◆भारतात रेडिओ आयसोटोप्स मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात , ते प्रमाण सायक्लोन 30 मुळे कमी होईल.
◆2019 वर्षाच्या मध्यापर्यंत सायक्लोन 30 कार्यरत होईल व उत्पादन सुरू करेल
◆भारतात Gallium 68/Germanium 68 आयसोटोपचा वापर स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी उपयोग होतो.
◆Palladium 103 आयसोटोपचा वापर - प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाच्या उपचारासाठी होतो.
◆कलकत्ता येथील Variable Energy Cyclotron Centre या अणू ऊर्जा आयोगाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रात सायक्लोन 30 सुरू होत आहे
◆भारतात रेडिओ आयसोटोप्स मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात , ते प्रमाण सायक्लोन 30 मुळे कमी होईल.
◆2019 वर्षाच्या मध्यापर्यंत सायक्लोन 30 कार्यरत होईल व उत्पादन सुरू करेल
◆भारतात Gallium 68/Germanium 68 आयसोटोपचा वापर स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी उपयोग होतो.
◆Palladium 103 आयसोटोपचा वापर - प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाच्या उपचारासाठी होतो.
मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल अंतर्गत 'कुलिंग ऍक्शन प्लॅन' तयार करणारा भारत जगातील प्रथम देश
◆ओझोन दिवस समारंभात - पर्यावरण व वन मंत्री - हर्षवर्धन यांनी ऍक्शन प्लॅन जारी केला.
◆उद्देश - 2037-38 पर्यंत भारताची कूलिंग डिमांड , ऊर्जा वापर यांचे व्यवस्थित नियमन करणे.
◆ICAP चे 2037-38 अखेर Target
1. विविध क्षेत्रातील कूलिंग मागणी 20-25% पर्यंत घटवणे
2. कूलिंग साधने (Refrigerant)ची मागणी 25-30% पर्यंत कमी करणे.
(जेणेकरून ओझोन क्षय करणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी होईल)
3. कूलिंग(शीतीकरणास) लागणारी ऊर्जा - 25 ते 40% पर्यंत कमी करणे.
4. स्किल इंडिया योजनेअंतर्गत - 2022-23 पर्यंत 1 लाख कूलिंग क्षेत्रात सेवा देणाऱ्या तंत्रज्ञाचे कौशल्य वाढवणे.
Wednesday, September 19, 2018
📌 MPSC वास्तव - Plan-B📌
🔸मित्रांनो , मी MPSC राज्यसेवा करतो , मी PSI-STI फॉर्म भरणार नाही , लिपिक तर मी फॉर्म पाहातही नसतो.
ही प्रवृत्ती महाराष्ट्रात राज्यसेवा तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांत दिसून येते.
🔸स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे एकवेळ पुरले पण वरील प्रवृत्ती म्हणजे 'कुऱ्हाडीवर जाऊन पाय मारणे आहे'
मित्रांनो , घरचे कष्ट करतात , काही नाहीतर Atleast त्यांच्या समाधानासाठी Contingency Plan(Plan B) म्हणून इतर परीक्षाही देत राहा.
पास झाल्यावर जॉईन करणे न करणे तुमच्या हातात असते.
राज्यसेवा जागा असतात 200 तर पेपर देणारे विद्यार्थी आहेत 2 लाखाच्या आसपास...
मात्र , हातातील संधी घालून केवळ राज्यसेवा करतो ही गुर्मी नंतर अंगलट येऊ नये.
★घरची परिस्थिती - स्वतःची बौद्धिक पातळी - कष्ट करायची तयारी यांचे योग्य संतुलन साधा.
मनाला लागणाऱ्या प्रत्येक शब्दामुळेच भविष्यात तुम्हाला चांगला मार्ग भेटेल.
(Imp - मीही वरील परिस्थितीचा साक्षीदार आहे. माझे अनेक मित्रही याच परिस्थितीतून गेले आहेत. )
सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा💐💐💐💐
प्रशांत खेडकर(STI 2017)
Tuesday, September 18, 2018
सामान्य अध्ययन Practice Test – 1
1) 1857 च्या उठावाबाबत 'कार्ल मार्क्स' यांनी काय मत मांडले होते?
1. स्वातंत्र्य संग्राम
2. सामान्य जनतेचा उठाव
3. सैनिक विद्रोह
4. महान राष्ट्रीय उठाव
2) 'नीलदर्पण' नाटकाच्या धर्तीवर कोणत्या लेखकाने 'जमीनदार दर्पण' हे नाटक लिहिले होते?
1. नुरूलुद्दीन
2. विष्णुचरण विश्वास
3. मुशर्रफ हुसेन
4. दिगंबर विश्वास
3) पहिले अखिल बंगाल विद्यार्थी संमेलन 1928 साली कोलकत्ता इथे भरले होते , या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
1. जवाहरलाल नेहरू
2. सुभाषचंद्र बोस
3. महात्मा गांधी
4. अरविंद घोष
4) "अहिंसा हा मानवधर्म आहे, तर हिंसा हा पशु धर्म आहे. मात्र , भेकडपणा व हिंसा यांत निवड करावी लागली तर मी हिंसेची करेल." हे प्रसिद्ध विधान कोणत्या भारतीय नेत्याचे आहे?
1. दादाभाई नौरोजी
2. महात्मा गांधी
3. जवाहरलाल नेहरू
4. सुभाषचंद्र बोस
5) भारतात 8 उद्योगांना मूलभूत उद्योग मानले जाते. (Core Industries)या मूलभूत उद्योगात सर्वाधिक वाटा कोणत्या उद्योगाचा आहे?
1. वीज निर्मिती
2. लोह पोलाद उत्पादन
3. कोळसा उत्पादन
4. पेट्रोल शुद्धीकरण प्रकल्प
6) संविधान निर्मितीसमयी कामकाज पार पाडण्यासाठी काही समिती स्थापन करण्यात आलेल्या होत्या.त्या समितीपैकी 'मुख्य आयुक्त प्रांतांबाबत' समितीचे प्रमुख/अध्यक्ष कोण होते?
1. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
2. पट्टाभी सीतारामैय्या
3. डॉ. राजेंद्रप्रसाद
4. डॉ. के.एम.मुन्शी
7) भारतीय संविधानाचा संरचनात्मक भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय संविधानाच्या संरचनेचा स्रोत कोणता आहे?
1. अमेरिका राज्यघटना
2. 1935 चा भारत सरकार कायदा
3. इंग्लंड राज्यघटना
4. कॅनडा राज्यघटना
8) भारतातील प्रथम श्वान उद्यान देशातील कोणत्या शहरात तयार होत आहे?
1. बेंगळुरू
2. हैद्राबाद
3. कोलकत्ता
4. चेन्नई
9) 1904 सालचा भारतीय विद्यापीठ कायदा - कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित होता?
1. सर अँड्र्यू फ्रेजर
2. भुपेंद्रनाथ बसू
3. टॉमस रॅले
4. विल्यम स्मिथ
10) भारतात खुल्या व्यापार तत्वाचा पुरस्कार करणारा व भारतातील सर्व बंदरे व्यापारासाठी खुली करणारा गव्हर्नर जनरल/व्हाईसरॉय कोण होता?
1. लॉर्ड डलहौसी
2. लॉर्ड रिपन
3. लॉर्ड विल्यम बेंटिक
4. लॉर्ड कर्झन
उत्तरे
1. 4
2. 3
3. 1
4. 2
5. 4
6. 2
7. 2
8. 2
9. 3
10. 1
★चालू घडामोडी शॉर्ट नोट्स★
1. सुदानचे नवे पंतप्रधान - मौताज मौसा अब्दल्ला (15 सप्टेंबर रोजी शपथविधी)
2. भारत HDI - 0.640 ( 130 वा क्रमांक)
प्रथम स्थान - नॉर्वे , शेवटचे(189 वे स्थान) - नायजर
3. "Friendship and Cooperation Agreement 2018"
--- दिल्ली सरकारने - सेऊल , दक्षिण कोरियाच्या महानगर प्रशासनाशी '2 शहरे' विकसित करण्याबाबत 12 बाबींशी संबंधित करार केला आहे.
4. भारताचा प्रथम अंडरवॉटर ड्रोन - EyeRov TUNA
5. 15 सप्टेंबर 2018 - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
Theme - Democracy under Strain: Solutions for a Changing World
2. भारत HDI - 0.640 ( 130 वा क्रमांक)
प्रथम स्थान - नॉर्वे , शेवटचे(189 वे स्थान) - नायजर
3. "Friendship and Cooperation Agreement 2018"
--- दिल्ली सरकारने - सेऊल , दक्षिण कोरियाच्या महानगर प्रशासनाशी '2 शहरे' विकसित करण्याबाबत 12 बाबींशी संबंधित करार केला आहे.
4. भारताचा प्रथम अंडरवॉटर ड्रोन - EyeRov TUNA
5. 15 सप्टेंबर 2018 - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
Theme - Democracy under Strain: Solutions for a Changing World
★पर्यटन पर्व 2018,★
🔸आयोजन - पर्यटन मंत्रालय
🔸17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2018 दरम्यान आयोजन
🔸पर्यटन पर्व महोत्सवाची दुसरी आवृत्ती
🔸3 घटक 1. देखो अपना देश
2. Tourism For All
3. Tourism and Governance
🔸17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2018 दरम्यान आयोजन
🔸पर्यटन पर्व महोत्सवाची दुसरी आवृत्ती
🔸3 घटक 1. देखो अपना देश
2. Tourism For All
3. Tourism and Governance
जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणारी रेल्वे
🔸जर्मनीमध्ये नुकतेच जगातील प्रथम हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी
🔸रेल्वेचे नाव - Ilint Trains
🔸उत्तर जर्मनीतील 100 किमी मार्गावर ही रेल्वे सेवा सुरू
🔸शून्य उत्सर्जन - संपूर्णतः पर्यावरण अनुकूल रेल्वे
🔸Ilint रेल्वेची कार्यप्रणाली -
1. रेल्वेत -हायड्रोजन फ्युल सेल असणार.
2.या फ्युल सेल हायड्रोजन + ऑक्सिजन अभिक्रिया घडवून आणणार, ज्यातून विद्युत निर्मिती - त्यावर रेल्वे चालणार.
3. या प्रक्रियेत उत्सर्जित घटक केवळ - पाणी व वाफ असणार.
4. अतिरिक्त ऊर्जा लिथियम बॅटरीमध्ये साठवून ठेवता येणार.
Monday, September 17, 2018
📌चालू घडामोडी नोट्स📌
1. 8 वा SAFF फुटबॉल चषक विजेता देश - मालदीव (यापूर्वी 2008 साली)
उपविजेता - भारत
2. इस्रोच्या PSLV C-42 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने - ब्रिटनचे - NOVASar आणि S1-4 हे उपग्रह प्रक्षेपित
3. Newsman- Tracking India in the Modi Era - मोदींच्या 2014 ते 2018 पर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवरील पुस्तक -
लेखक - राजदीप सरदेसाई
4. जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
2018 Theme - Keep Cool and Carry On Montreal Protocol ( 1995 पासून साजरा केला जातो)
5. 15 वा प्रवासी भारतीय दिन - 2019 - वाराणसी शहरात आयोजित केला जाणार.
Sunday, September 16, 2018
राज्यसेवा पूर्व २०१९ - सामान्य अध्ययन सराव पेपर - विज्ञान

विज्ञानातील मार्क वाढावे या उद्देशाने आपण सामान्य विज्ञान व दैनंदिन विज्ञान या घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न सराव करून घेणार आहे.
विज्ञान पेपर लिंक- सामान्य विज्ञान पेपर
महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले
महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक , स्त्री शिक्षणाचे प्रणेते , शेतकरी , कामगार यांचे उद्धारक
PDF करिता क्लिक करा - महात्मा ज्योतिबा फुले
महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक , स्त्री शिक्षणाचे प्रणेते , शेतकरी , कामगार यांचे उद्धारक
PDF करिता क्लिक करा - महात्मा ज्योतिबा फुले
मुलाखतीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी - अभिनव बलुरे सर, उत्पादन शुल्क अधीक्षक (Excise SP) यांचे अनमोल शब्द
★राज्यसेवा
2018 मध्ये मुलाखतीला
जाणाऱ्या सर्वांसाठी
....★
अभिनव बलुरे सर, उत्पादन शुल्क अधीक्षक (Excise SP)
मित्रांनो पहिल्या उत्तरतालिकेनुसार आपल्या सर्वांनाच मार्कांचा अंदाज आलेला आहे. काही दिवसांनी मुलाखत होऊन तुमच्यापैकी बरेच जण अंतिम यादीत झळकाल.
मात्र या दरम्यानच्या काळात अनेक संधीसाधू तुम्हाला गोड बोलतील, तुम्हाला मुलाखतीची तयारी करायला मदत करतो म्हणून तुम्हाला जवळ करतील, तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर तुमच्यावर उपकार करण्याचा प्रयत्न करतील.. मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन देतील, चांगल्या हॉटेल मध्ये जेवू घालतील.. आणि आपणही आंधळेपणाने त्यांच्या गोड बोलण्याला भाळतो आणि निवड झाल्यानंतर त्यांचे गुणगान करत महाराष्ट्रभर फिरतो..
पण मित्रांनो, आपल्या मनाला एक प्रश्न विचारा. जेव्हा आपण MPSC च्या तयारीला लागलो तेव्हा कुणी केली असती का हो आपल्याला अशी मदत? आपण कितीही परिस्थिती नाजूक आहे असं सांगितलं तरी टप्प्या टप्प्यात पूर्ण फीस भर असं सांगतील.
आपण या टप्प्यापर्यंत आलात याचं पूर्ण श्रेय तुम्ही मागील काही वर्षात घेतलेल्या कष्टांना आहे.. बालवाडीपासून आतापर्यंत तुमच्यासाठी खस्ता खाणाऱ्या तुमच्या आईवडिलांचं आहे..तुम्ही आतापर्यंत दाखवलेल्या तुमच्या संयमाला आहे.. मग हे श्रेय असं ऐनवेळी कुणाला का म्हणून द्यायचं?
त्यामुळं इथून पुढं 2 महिने कुणाकडून उपकार करून घेऊ नका... आर्थिक मदतीसाठी, डिनर पार्टीसाठी, पुढील प्रसिद्धीसाठी स्वतःला विकू नका.. मुळात तुमची मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व हे 2 महिन्यात कुणी घडवून देणारं नसतं... खरं तर तुम्ही नैसर्गिकपणे, प्रामाणिकपणे स्वतः तयारी केलीत तर मुलाखतीला चांगले गुण येण्याची संभावना जास्त आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यांनी अशा कोणाही बाजारूंची मदत न घेता मुलाखतीला टॉप केलेले आहे. अशीही ढीगभर उदाहरणे आहेत, ज्यांनी यांच्याच भरवशावर मुलाखतीची सर्व तयारी केली व मुलाखतीला खूप कमी गुण आले आणि त्यामुळे निवड न झाल्यानंतर अशांना या so called मार्गदर्शकांनी धीर देण्याचे तर सोडा, साधी ओळख पण दिली नाही.
जर तुम्हाला खरच मुलाखतीसाठी कुणाचा फायदा झाला असेल तर निवड झाल्यावर फक्त मुलाखतीसाठी फायदा झाला असं स्पष्ट सांगा.
तुमची निवड झाल्यावर तुमच्या भाषणातील शब्द नि शब्द महत्वाचा असतो. त्या शब्दावर विश्वास ठेवून खेड्यापाड्यातील हजारो मुलं थेट पुण्यात येतात.. आणि तुम्ही ज्या व्यक्तीच नाव घेतलं त्या माणसाकडे 70-80 हजार रूपये भरून ऍडमिशन घेतात.. ही सर्व अब्जावधीची उलाढाल आहे. आपण फक्त या अशा क्लास चालकांसाठी एक प्यादे आहोत..आज आपल्या नावाचा वापर करतील उद्या इतर कुणाच्या.
पटलं तर बघा...जमल्यास शेअर करा.
टीप :
अर्थात ही पोस्ट कुण्या व्यक्तिविरोधात नाहीये तर स्वकष्टाने मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना जाळ्यात अडकवू पाहणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे.
अशा जाळ्यात ओढलेल्या यशवंताच्या मुलाखती आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांची कशी दिशाभूल करतात, याचा जवळून अनुभव घेतलाय. परिस्थिती नसताना कर्ज काढून क्लासची फी भरणारे पाहिलेत. तेव्हा विचार करायचो, पोटांना पीळ देऊन असे का करत असतील हे लोकं? तर त्याचे मूळ कारण आहे, निवड झालेल्या उमेदवारांची ही बेजबाबदार वागणूक. आपला वापर करून घेतला जातोय, एवढी साधी गोष्ट या भावी अधिकाऱ्यांना कळू नये का? हीच खरी खंत आहे. त्यासाठी हा खटाटोप. मला कल्पना आहे, या परिस्थितीमध्ये फार काही बदल होणार नाही. पण म्हणतात ना, काही मोठा बदल करायचा असेल तर सुरूवात स्वतःपासून करा.
तशी मी सुरूवात तर केलेलीच आहे.. बघूया काही सकारात्मक बदल होतोय का?