Tuesday, September 25, 2018

PSI-STI-ASO 2019 Study Plan By Prashant Khedkar (STI 2017)

★PSI-STI-ASO 2019 करिता अभ्यास कसा करावा★


1. अभ्यासाचे विषयवार नियोजन
◆नियोजन म्हणजे काय ? 4 गटात अभ्यास विषय विभागणी
प्रथम गट - GS      द्वितीय गट - बुद्धीमत्ता व अंकगणित      तृतीय गट - चालू घडामोडी
चतुर्थ गट - Revision
तुम्ही जो अभ्यास करणार त्याचे 4 घटक असावेत.

★प्रथम गट विषय - इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , विज्ञान (काही अंशी पर्यावरण)
या गटातील एक विषय अभ्यासास घेतला तर तो पूर्ण विषय पूर्ण होईपर्यंत रोज त्याच विषयाचे 6 तास वाचन - नोट्स काढणे करावे.
एक विषयास(एक पुस्तक) 20-25 दिवस नोट्स करिता पुरेसे आहेत.
अश्या प्रकारे सर्व 5 GS विषय अभ्यास पूर्ण होण्यास - 100 दिवस लागतील (ज्यात एक पुस्तक प्रत्येक विषयाचे वाचून पूर्ण होईल, नोट्स सह)

★द्वितीय गट विषय - बुद्धीमत्ता आणि अंकगणित 
या विषयाचा जास्तीत जास्त सराव केल्यास पूर्व परीक्षेत येणारे 15 प्रश्न व मुख्य परीक्षेत येणारे 10 प्रश्न हमखास मार्क देऊन जाणारे आहेत.
त्यामुळे या घटकांचा रोज 2 तास तरी सराव आवश्यक.
(टीप - हा घटक Ignore केल्यास पूर्व परीक्षा पास होणे कठीण)

★तृतीय गट - चालू घडामोडी
--सर्वात Productive मात्र काय वाचावे यात Confusion करणारा घटक.
-- मुद्दा 1 - वृत्तपत्र वाचन - 15-30 मिनिटपेक्षा जास्त नको.
-- मुद्दा 2 - चालू घडामोडीचे केवळ एक पुस्तक वाचावे, कोणतेही नवीन पुस्तक आले की घेऊन जमा करू नये.
-- मुद्दा 3 - या घटकांचा अभ्यास व नोट्स रोज 2 तास हवे. हा घटकही पूर्व परीक्षेत 15 व मुख्य परीक्षेत 10 मार्क हमखास देऊन जातो.

★चतुर्थ घटक -
● GS अभ्यास आपण एक विषयाचा करतोय त्यामुळे इतर विषयात 20 दिवस मागे पडू नये म्हणून हा घटक अत्यावश्यक.
● ज्या विषयाचा अभ्यास सुरू आहे , तो विषय वगळून इतर GS विषयांची रोज 15-20 मिनिट अश्याप्रकारे 2 तास उजळणी करावी.
●जेणेकरून प्रत्येक विषय Update राहील.

2. परीक्षेकरिता पुस्तक यादी
https://mpsconlinepreparation.blogspot.com/2018/09/psi-sti-aso.html?m=0

3. PSI-STI-ASO तयारी करताना Plan B कसा असावा.
●सर्वात सोपा Plan B हा तुम्ही तयार करू शकता तो म्हणजे रोज 2 तास इंग्रजी व मराठी विषयांचा अभ्यास .
●या अभ्यासामुळे PSI-STI-ASO वगळता इतर सरळसेवा परीक्षा तुम्हाला व्यवस्थित देता येतील.
●पोस्ट जॉईन करणे , न करणे तुमच्या हातात आहे मात्र , कोणतीही सरळ सेवा परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारे समाधान खूप असते.
★मी स्वतः STI आधी म्हाडा लिपिक(राज्यात प्रथम) , सहायक वाहतूक निरीक्षक(ST महामंडळ) , सांख्यियीकी सहायक व अन्वेषक या पदांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो होतो.

4. घरच्यांचा , आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्या यशाचे आनंदाश्रू असावे यासाठी अभ्यास करा.

5. स्वतःला फसवू नका, म्हणजे काय ते खाली काही उदाहरण आहेत.
★घरचे तुम्हाला पैसे पाठवतात , ते काबाडकष्ट करून त्यांची किंमत करा.
★घरच्यांचे पैसे अभ्यासावर खर्च करा. पार्टी , लोणावळा खंडाळा फिरणे , ट्रेकिंग यावर खर्च करू नका.
(परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला जिकडे फिरायचे तिकडे फिरा घरचे पण काही बोलणार नाही.)
★अभ्यास करायला पुणे गेलेच पाहिजे का?
--ज्यांना घरात पैसे ठेवायला जागा नसेल त्यांनी हमखास पुणे जावे, मात्र ज्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे किंवा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांनी कुठंही अभ्यास केला तरी अभ्यास होतो.
★अभ्यासाला पुणेच गेले पाहिजे व पुणे गेले की पास होते असे ज्यांना वाटते त्यांना एकच सांगेल पुणेला 80000 च्या आसपास विद्यार्थी सध्या अभ्यास करतात त्यातले 200 पास होतात.
त्यामुळे उगाच पुणे जाऊन मज्जा करायची असेल तर घरच्यांना फसवू नका व स्वतःच्या 😊
मनाला फसवू नका.

6. इतर काही शंका असल्यास t.me/STI_Prashant या माझ्या telegram लिंकवर संपर्क करावा.

प्रशांत मधुकर खेडकर
(राज्यकर निरीक्षक 2017)

13 comments: